वेरूळ शिवारातील रस्ता अडवल्यास थेट गुन्हे

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी) : वेरूळ शिवारातील काळे वस्ती परिसराकडे जाणारा रस्ता पूर्वापार वहिवाटीचा व गाव नकाशात असल्यास तीन दिवसांत मोकळा करून दिला जाईल. यात अडथळा आणणा-यांवर महसूल प्रशासनाकडून थेट गुन्हे दाखल केले जातील, असा कडक इशारा तहसीलदार संतोष गुट्टे यांनी मंगळवारी (दि. २१) दिला. 

वेरूळ येथे रोतापासून मुख्य रस्त्यापर्यंत रस्ता नसल्याने वेळोवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे शेतकरी
सखाराम किसान जाधव यांचा मृत्यू झाला होता. रस्ता नसल्यामुळेच हा अनर्थ वाढल्याचा आरोप कुटुंचीयांनी केला होता. 

या घटनेच्या निषेधार्थ बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांच्यासह परिसरातील शेतकरी व विद्याथ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन रस्ता तात्काळ मोकळा करण्याची मागणी केली. तहसीलदार गुट्टे यांनी तलाठ्यांना घटनास्थळाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.